Powered by Invision Power Board


  Reply to this topicStart new topicStart Poll

> शिवाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले
Marathi Forum
Posted: September 18, 2006 12:13 pm
Quote Post


FOUNDER
***********

Group: ADMIN
Posts: 787
Member No.: 1
Joined: September 15, 2006




user posted image

ओळख

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

जन्म

जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी ई.स. १९ फेब्रुवारी १६३० (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शहाजीराजे

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने ई.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनस्स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरु होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न प्रथम पाहून ते स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.



--------------------
Visit New Forum here...

http://indian-forum.info
PMEmail PosterUsers WebsiteYahoo
Top
Marathi Forum
Posted: September 18, 2006 12:20 pm
Quote Post


FOUNDER
***********

Group: ADMIN
Posts: 787
Member No.: 1
Joined: September 15, 2006



युद्धमय जीवन

सुरूवातीचा लढा

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

ई.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), राजगड, आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.

शहाजीराजांना अटक

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली.

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी ई.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला ज्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.


user posted image

शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे
आयुष्य युद्धे करण्यात गेले.
युद्धप्रसंगी घोड्यावरून प्रवास
करताना झोपदेखील ते घोड्यावरच
आणि केवळ तीन-चार तास घेत असत.


--------------------
Visit New Forum here...

http://indian-forum.info
PMEmail PosterUsers WebsiteYahoo
Top
Amit
Posted: September 20, 2006 02:27 pm
Quote Post


New Member
**

Group: Members
Posts: 29
Member No.: 24
Joined: September 20, 2006



user posted image
PMEmail Poster
Top
Amit
Posted: September 20, 2006 02:33 pm
Quote Post


New Member
**

Group: Members
Posts: 29
Member No.: 24
Joined: September 20, 2006



user posted image
PMEmail Poster
Top
Amit
Posted: September 20, 2006 02:36 pm
Quote Post


New Member
**

Group: Members
Posts: 29
Member No.: 24
Joined: September 20, 2006



user posted image
PMEmail Poster
Top
Marathi Forum
Posted: September 20, 2006 02:37 pm
Quote Post


FOUNDER
***********

Group: ADMIN
Posts: 787
Member No.: 1
Joined: September 15, 2006



खरच खुप छान कविता आहे ...

आणि तुझी सुरुवात सुद्धा चांगली आहे फोरममध्ये..

कृपया हिच कविता 'कविता फोरम' मध्ये सुद्धा पाठवावी..


--------------------
Visit New Forum here...

http://indian-forum.info
PMEmail PosterUsers WebsiteYahoo
Top
Amit
Posted: September 20, 2006 02:42 pm
Quote Post


New Member
**

Group: Members
Posts: 29
Member No.: 24
Joined: September 20, 2006



user posted image
PMEmail Poster
Top
prince_1_19
Posted: July 14, 2009 12:53 am
Quote Post


Megic Member
*****

Group: Members
Posts: 139
Member No.: 1173
Joined: July 12, 2009





jay bhavani jay shivaji.....................

good information … thanks

==================
get more information

PMEmail Poster
Top
splendersm
Posted: July 31, 2009 05:21 am
Quote Post


Fresh Member
***

Group: Members
Posts: 60
Member No.: 1175
Joined: July 16, 2009



jai bhavani ,
jai shivaji...


Thank You
PMEmail Poster
Top
1 User(s) are reading this topic (1 Guests and 0 Anonymous Users)
0 Members:

Topic Options Reply to this topic Fast Reply Start new topicStart Poll